Thursday, October 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी भवन मंजूर....

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी भवन मंजूर….

१.५२ कोटीची तरतूद; नितेश राणेंच्या मागणीला पणनमंत्र्यांकडून हिरवा कंदील…

सिंधुदुर्ग,ता.०९: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नवीन शेतकरी भवन उभारण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजने’अंतर्गत हे भवन उभे राहणार असून यासाठी १ कोटी ५२ लाख ४४ हजार ४७८ इतक्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. ​​हे शेतकरी भवन मंजूर होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांनी पणन

मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्रव्यवहार करत या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली. पालकमंत्री राणे यांच्या पत्राची दखल घेत पणन मंत्री रावल यांनी तात्काळ हा महत्त्वाचा निधी मंजूर केला.

​सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ९ ऑक्टोबरला शासन निर्णय जारी करत या शेतकरी भवनाच्या बांधकामासाठी अंदाजपत्रकास मंजूरी दिली. बाजार समितीने यापूर्वी पणन संचालनालयाकडे पाठपुरावा केला होता. ज्याचा आधार घेत पालकमंत्री राणे यांनी पत्रव्यवहार केला आणि या प्रयत्नांना यश मिळाले.​​ या शेतकरी भवनमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बाजार समितीच्या कामासाठी आल्यास मुक्कामाची सोय आणि अन्य मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यामुळे त्यांची गैरसोय टळून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ​या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी आणि सभापती तुळशीदास रावराणे यांच्या वतीने पालकमंत्री राणे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांचे विशेष आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments