Thursday, October 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत आता रोज प्रवेश घेणार... 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत आता रोज प्रवेश घेणार… 

संजू परबांचा दावा; मळेवाड पंचक्रोशीतील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश…

सावंतवाडी,ता.०९: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे यापुढे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षात प्रवेश वाढतील, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला. दरम्यान यावेळी मळेवाड, कोंडूरा व साटेली येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह मळेवाड सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री.परब यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी मळेवाड सोसायटी चेअरमन प्रकाश पार्सेकर, व्हा. चेअरमन प्रकाश राऊत, संचालक गोविंद मुळीक, गोपिका रेडकर, अर्जून तेली, धाकू शेळके, देऊ शिरसाट, रविंद्र तळवणेकर, दाजी पार्सेकर, दाजी गावडे, एकनाथ गावडे, दत्ताराम मुळीक, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सतिश नाईक, विभागप्रमुख दाजी रेडकर, महिला उप तालुकाप्रमुख साधना कळंगुटकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जून मुळीक आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

यावेळी गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मळेवाड जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीत भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी आतापासूनच पूर्ण तयारीला लागावे, असे ही त्यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, परिक्षीत मांजरेकर, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments