कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू; दात्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन…
सावंतवाडी, ता.०९: निमोनिया झाल्यामुळे सावंतवाडीतील तीन वर्षाची चिमुरडी जगण्याची झुंज देत आहे. जिल्ह्यात तिच्यावर उपचार होवू न शकल्यामुळे कोल्हापुर येथील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यासाठी १० ते १५ लाखाचा खर्च अपेक्षीत आहे. त्यामुळे समाजातील दानशुरांनी तिला मदत करावी, असे आवाहन त्यांच्या मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे. “नृत्या” असे तिचे नाव आहे. ती सावंतवाडी येथील कोरोओग्रापर महेश जांभोरे यांची मुलगी आहे. जन्मापासून तिला काही ना काही आजार होते. मात्र त्यात वडिलांनी आपल्याकडील जमापुंजी खर्च करुन तिच्यावर उपचार सुरू ठेवले होते. आठवडाभरापूर्वी तिला ताप येवू लागला. अशा अवस्थेत तिला सावंतवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्याठिकाणी तिच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले. परंतू त्याठिकाणी तीचे उपचार होणार नाहीत, असे सांगून तिला कोल्हापुर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार आज तिला कोल्हापुर येथील साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. आता तिच्यावर उपचार करण्यासाठी १० ते १५ लाख इतक्या रक्कमेची गरज आहे. वस्तूस्थिती लक्षात घेता जांभोरे यांची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही. त्यामुळे समाजातील दानशुरांनी शक्य तितकी मदत द्यावी, असे आवाहन त्यांच्या मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.
त्यासाठी प्रवीण कुबल (7066415169) या नंबरवर संपर्क साधावा. तसेच ज्या दात्यांना आर्थिक मदत द्यायची असेल त्यांनी या बँक अकाउंटवर IFSC :- SBIN0000476, Account no :- 20300618631 किंवा गुगल पे महेश जांभोरे (9545472152) वर आपली मदत पाठवावी.