सावंतवाडी,ता.०९: पालक सचिव तथा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह हे ११ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे: ११ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजल्यापासून वीरेंद्र सिंह, हे सावंतवाडी येथील खालील कार्यालयांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतील. तसेच आवश्यक सूचना करणार आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय, सावंतवाडी, तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी, पंचायत समिती, सावंतवाडी, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यानंतर ते बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यालयासही भेट देणार आहेत. सावंतवाडी येथील या भेटीदरम्यान ते स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य सुविधा आणि विकास कामांचा सखोल आढावा घेतील. प्रशासकीय गतिमानता आणि आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.
आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह ११ ऑक्टोबरला सिंधुदुर्गात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES