Friday, October 10, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामोती तलावात आत्महत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचा मृतदेह सापडला...

मोती तलावात आत्महत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचा मृतदेह सापडला…

आत्महत्येचे कारण अस्पष्ट; सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद…

 

सावंतवाडी,ता.१०: येथील मोती तलावात उडी घेतलेल्या सालईवाडा येथील रिक्षा चालक रमेश जाधव यांचा मृतदेह हा तब्बल १७ तासानंतर तलावाच्या पात्रात आढळून आला. त्यांनी काल रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली होती. यासाठी बाबल अल्मेडा टीमची मदत घेण्यात आली. त्यांच्या सदस्यांनी पाण्याच्या आत जाऊन शोध घेऊन हा मृतदेह अवघ्या काही मिनिटात बाहेर काढला. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली? याबाबतचे कारण अस्पष्ट आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments