सावंतवाडी,ता.१०: युवा नेते विशाल परब यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त “रिलोत्सव २०२५” या भव्य रिल्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमुळे कोकणच्या सौंदर्य आणि संस्कृतीला कलात्मक दृष्टीने जगासमोर आणण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या स्पर्धेचा “कोकण माझ्या नजरेतून” (पर्यटन, संस्कृती, लोककला, धार्मिक व आध्यात्मिक कोकण) हा विषय आहे. स्पर्धकांनी कोकणाचे सौंदर्य, स्वाभिमान, अभिमानाचे दर्शन घडवणारे आपले कलेतून तयार केलेले रिल्स सादर करायचे आहेत. रिल्स पाठवण्याची अंतिम तारीख १० ते १५ ऑक्टोबरपर्यंत आहे. स्पर्धकांनी तयार केलेले रिल्स विशाल परब यांच्या vishalparabspeaks व vishal.parab_fc या पेजेसवर कोल्याब्रेशन करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ७६६६३१९३०९ या नंबरवर संपर्क साधावा.