Friday, October 10, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याक्रिटिकल केअर ब्लॉक रुग्णालयाचे काम दर्जेदार व लवकर पूर्ण करा...

क्रिटिकल केअर ब्लॉक रुग्णालयाचे काम दर्जेदार व लवकर पूर्ण करा…

विरेंद्र सिंह; आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवा, आरोग्य प्रशासनाला सूचना…

 

सिंधुदुर्गनगरी, ता.१०: क्रिटिकल केअर ब्लॉक रुग्णालयाचे काम दर्जेदार व लवकरात-लवकर पूर्ण करा तसेच आयुष्य औषध भंडारास जागा उपलब्ध करून द्या, अशा सूचना आज राज्याचे आरोग्य सचिव वीरेंद्रसिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान शासनाच्या सर्व योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एकत्रितपणे काम करावे, असेही त्यांनी सांगितले. श्री. सिंग यांनी आज जिल्हा रुग्णालयाची व महाविद्यालयाची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते. या पाहणीदरम्यान श्री. सिंह यांनी क्रिटिकल केअर ब्लॉकच्या बांधकामाविषयी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली आणि बांधकाम निर्धारित मुदतीत व उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावेळी ते म्हणाले की, शासनाच्या सर्व आरोग्य योजना आणि सेवा या नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एकत्रितपणे समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे. यानंतर त्यांनी आयुष इमारतीची पाहणी केली. सध्या या इमारतीत अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे कार्यालय व आस्थापना कार्यरत आहेत. मात्र इमारत तयार असूनही रुग्णालयाचे कामकाज सुरू झालेले नाही, याची त्यांनी नोंद घेतली. या संदर्भात श्री. सिंह यांनी अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आणि बांधकाम विभाग यांच्यासोबत संयुक्त चर्चा करून इमारतीचा काही भाग आयुष विभागासाठी वापरात आणून रुग्णालय त्वरित कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. ए.आय. सिंधुदुर्ग प्रकल्पांतर्गत आरोग्य विभागाने विकसित केलेल्या दोन ॲप्लिकेशन्स तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे संकेतस्थळ व डॅशबोर्ड यांचे प्रात्यक्षिक श्री. सिंह यांना सादर करण्यात आले. त्यांनी या तंत्रज्ञानाधारित उपक्रमांचे कौतुक करत डिजिटल आरोग्य सेवांना अधिक प्रभावी बनविण्याच्या सूचना दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments