कुडाळ,ता.११: राज्यभर वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वनविभाग सिंधुदुर्गच्या वतीने पाट हायस्कूल मध्ये सर्पा विषयक समज गैरसमज या विषयावर प्रात्याक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.
सापांचे विविध प्रकार विषारी बिनविषारी सापाची ओळख त्यावरील वैद्यकिय उपाय आणि प्राथमिक उपचार या विषयी जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा वन अधिकारी मगदुम साहेब, श्रेया परब, बनसोडे यांनी सहभाग घेतला. मुलांनीही विविध प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ही जैवविविधता समजून घेतली.
या सात दिवसात विविध रोपांचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमामध्ये सर्पमित्र श्री. जोशी यांनी पोष्टरद्वारे माहिती समजाऊन दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा वनाधिकारी मगदूम, मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी केले. पर्यवेक्षक सयाजी बोंदर उपक्रम प्रमुख संदीप साळसकर आणि शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.