कुडाळ,ता.११:पाट हायस्कूलच्या अकरावी मधील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन फ्रॉड .सायबर क्राईम. विषयक माहिती देण्यात आली. सावधानता म्हणून पासवर्ड, ओटीपी, बँक खाते, वैयक्तिक माहिती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस श्रीमती धनश्री परब यांनी सविस्तर माहिती दिली, तर मार्गदर्शक म्हणून सागर भोसले, निकिता परब, अभिषेक गायकवाड उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साळसकर तरळ
या कार्यक्रमाचे आभार सुचित्रा गोसावी मॅडम यांनी मानले. मुलांच्या प्रश्नांना उत्तर देऊन लोकांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचावी असे आवाहन सागर भोसले यांनी केले. त्याचप्रमाणे समाजात घडलेले काही फसवणुकीचे उदाहरणेही दिली. कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते. याविषयी मुलांना जागृत केले.