मालवण, ता. ६ : शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक दैवज्ञभवन येथे आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी पक्ष संघटना वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत निवडून आलेले महाविकास आघाडीचे जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, सुशांत नाईक, मेघनाद धुरी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, बाबा सावंत, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, बाळ महाभोज, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, मंगेश गावकर, नितीन वाळके, विजय पालव, अमित भोगले, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, पूनम चव्हाण, श्वेता सावंत, दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, नंदा सारंग, अंजना सावंत, भारती आडकर, मंदार ओरसकर, प्रसाद मोरजकर, दीपक देसाई आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



