वेंगुर्ले,ता.०४: संमोहन तज्ञ मनोहर नाईक यांचे सहकारी आणि आसोली गावचे सुपुत्र सद्गुरु आत्माराम धुरी (८६) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते सद्यस्थित मुंबई येथे वास्तव्यास होते. तर आसोली हायस्कूलचे संस्थापक दादा धुरी यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात १ मुलगा, २ मुली, भाऊ, पुतणे, पुतण्या, नातवंडे, असा परिवार आहे.
कै.धुरी हे गेली अनेक वर्षे कामानिमित्त आपल्या परीवारा सोबत मुंबई येथे वास्तव्यास होते. दरम्यान नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी जादूगर आणि संमोहन क्षेत्रातील आपली आवड जोपासली. जगविख्यात संमोहन तज्ञ मनोहर नाईक यांच्यासोबत त्यांनी अनेक जादूचे व संमोहनाचे कार्यक्रम केले. गेले काही दिवस ते आजारी होते. दरम्यान आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने नातेवाईकांसह धुरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.