Friday, October 10, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांदा-इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतूक रोखली, ५० लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

बांदा-इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतूक रोखली, ५० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त…

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; अंधाराचा फायदा घेत चालकाचे पलायन, गुन्हा दाखल…

बांदा,ता.०४: राज्य उत्पादन शुल्काच्या इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल ४१ लाख ४० हजारच्या दारूसह ९ लाख ५० हजारचा आयशर असा मिळून एकूण ५० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. मात्र अंधाराच्या व वाहनांच्या वर्दळीचा फायदा घेऊन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे वाहन मालक दशरथ मीणा (रा. मध्यप्रदेश) याच्यासह अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अधीक्षक बी.एस. तडवी, उपअधीक्षक आर. इ. इंगळे, संजय मोहिते, तानाजी पाटील, प्रदीप रासकर, अमित पाडळकर, के.डी. कोळी, ए.बी.पाटील आदींनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments