बांदा,ता.०५: शहरातील १२५ वर्षे पुर्ण झालेल्या नट वाचनालयाच्या विस्तारित बांधकामासाठी समाज्यातील दानशुर व्यक्तीकडून मदतीचा वाढता ओघ सुरूच असून मुंबई येथील सौ. अनिशा अमोल माजगावकर यांनी आपली सासू कै. सौ.अनुपमा अंकुश माजगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ११,१११/- ची देणगी दिली
सदरील देणगी अंकुश रामचंद्र माजगावकर यांनी वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, सचिव राकेश केसरकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी शंकर नार्वेकर सहसचिव हेमंत मोर्ये, दिलीप ठाणेकर मुंबई उपस्थित होते .माजगावकर कुटुंबीयांनी दिलेल्या या देणगीबद्दल वाचनालयाच्या वतीने माजगावकर कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले