Wednesday, October 8, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याश्री पंचम खेमराज महाविद्यालययात रसायनशास्त्र विभागाकडून "फिनाईल" बनविण्याचे प्रशिक्षण...

श्री पंचम खेमराज महाविद्यालययात रसायनशास्त्र विभागाकडून “फिनाईल” बनविण्याचे प्रशिक्षण…

सावंतवाडी,ता.०५: येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी फिनाईल बनवण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ.शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल ,रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. जी एम शिरोडकर ,रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. डी .डी . गोडकर, रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे हा उपक्रम चालू आहे. यामुळे काही मुलांनी फिनाईल बनवण्याचा आपला व्यवसाय सुरू केला आहे. रसायनशास्त्र विभागाच्या उपक्रमातून मिळालेल्या फायदा गरीब मुलांना शिक्षणासाठी केम फंडच्या माध्यमातून दिला जातो, असे रसायनशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक जी.एम.शिरोडकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments