Thursday, October 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावाफोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी धनश्री गवस...  

वाफोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी धनश्री गवस…  

निवडणूक प्रक्रियाबिनविरोध; उपाध्यक्षपदी अनिल गवस यांना संधी…

बांदा,ता.०५: वाफोली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. सोसायटीच्या अध्यक्षपदी ग्रामविकास पॅनलच्या धनश्री विलास गवस तर उपाध्यक्षपदी अनिल शांताराम गवस यांची निवड करण्यात आली.

संचालक मंडळात शिवाजी गवस, मारुती गवस, विष्णू गवस, हरिश्चंद्र आरोंदेकर, जयदेव गवस, चंद्रकांत आईर, दशरथ आईर, ज्ञानेश्वर ठाकूर, भाग्यश्री खानोलकर, अर्जुन गवस यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सावंतवाडी उपनिबंधक कार्यालयाचे श्रीकांत कावले यांनी काम पाहिले. यावेळी युवा नेते विनेश गवस, वाफोली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विलास गवस, पोलीस पाटील आना गवस, धर्मेंद्र खानोलकर, सचिन गवस, सतीश गवस, बापू राणे, संदीप धुरी, सेल्समन संगीता कोकरे, सचिव सुधा गवस, मापारी हरी गवस, रंजन गवस आदी उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचे विनेश गवस, विलास गवस यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

नूतन अध्यक्ष धनश्री गवस म्हणाल्या की, आपल्या सहकार क्षेत्रातील अनुभवाचा वापर करून संस्थेच्या सर्व संचालक मंडळ व गावातील सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठीतांना एकत्र घेऊन सोसायटीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात येईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनेश गवस यांनी केले तर आभार विलास गवस यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments