श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील खाद्य महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

3
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०५: येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या खाद्य महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचा शुभारंभ युवराज्ञी सौ.श्रद्धा सावंत-भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ शुभदादेवी खेमसावंत भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखन सावंत भोसले, संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, सौ सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.ङी.एल भारमल, कला व संस्कृती विभाग प्रमुख डॉ डी जी बोर्डे, समिती सदस्य डॉ एस एम बुवा, सौ पूनम सावंत, प्रा.सौ एन.डी धुरी तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग ‘शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात खाद्य महोत्सव चे आयोजित करण्यात आले होते या महोत्सवात विद्यार्थ्यांनी बनवलेले खाद्य पदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते यात शाकाहारी व मांसाहारी पदार्थ तसेच विविध शीतपेये, आईस्क्रीम कांदाभजी, पाणीपुरी, शेवपुरी, फ्रूट सलाड, प्राॅन्स फ्राय, बिर्यानी, मोमोज असे अनेक पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवले होते यामुळे खवय्यांनी या सर्व पदार्थांचा आस्वाद घेत आनंद लुटला