ओरोस,ता.०५: भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला विंगच्या अध्यक्षपदी कुडाळ तालुक्यातील बाव येथील सौ. स्वामिनी सुधीर परब यांची नियुक्ती झाली आहे.
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था ही १९९९ पासून कार्यरत असलेली संस्था आहे. ही संस्था जनहित व सामाजिक हितासाठी कार्य करते. आता ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे कार्य सुरू करणार आहे.
जिल्ह्यात महिला विंग पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सचिव पदी बांदा येथील श्रीमती करिश्मा रमेश धनराज यांची तर कायदेशीर सल्लागार पदी कणकवली येथील सौ. स्मिता मनोज कुळकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आशुतोष त्रिपाठी, राष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद त्रिवेदी व अन्य राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत याना नियुक्ती पत्र देण्यात आली.