सावंतवाडी,ता.०५: शहरातील पान व्यवसायिक अनिल वसंत सावंत (५४) रा.सालईवाडा यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस आजारी असल्यामुळे त्यांच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. तर चार दिवसांपूर्वी त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईत त्यांचे पान टपरी होती. त्या ठिकाणी ते व्यवसाय करत होते. दरम्यान गेले काही दिवस अल्पशा आजाराने त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. तर चार दिवसापूर्वी त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले.