Friday, October 10, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यायशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये आज चौथी राष्ट्रीय परिषद संपन्न...

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये आज चौथी राष्ट्रीय परिषद संपन्न…

सावंतवाडी,ता.०५: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आज चौथी राष्ट्रीय परिषदे संपन्न झाली. ‘नॉव्हेल ट्रेंडस फार्मास्युटिकल रीसर्च’ हा या परिषदेचा मुख्य विषय होता. याप्रसंगी देशभरातून सुमारे ६५० विद्यार्थी व शिक्षक या परिषदेत सहभागी झाले होते.

औषधनिर्माण क्षेत्रातील चालू घडामोडीचा आढावा घेणे आणि त्याच निमित्ताने येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्येशानेच या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फार्मसी क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी व्यक्तींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला. प्रथम सत्रांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंडियन फार्मास्युटिकल असोशियन (आय. पी. ए., महाराष्ट्र राज्य शाखा)चे विभागीय प्रमुख-डॉ. जॉन डिसूझा तसेच शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मराठे व प्राध्यापक डॉ. राजेश नवले यांच्या चर्चासत्राचे आयोजन करणयात आले होते.

परिषदेच्या उत्तरार्धामध्ये, दुपारच्या सत्रांत भित्तीपत्रक सादरीकरण (पोस्टर प्रेझेंटेशन) स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये भारतातील विविध राज्यातुन जसे- महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात इ.ठिकाणाहुन ८० पेक्षा जास्त भित्तीपत्रक सादरीकरण करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे काही संशोधक उपस्थित होते. परिषदेचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.विनोद मुळे, डॉ.रोहण बारसे, प्रा.सत्यजित साठे, प्रा.तुषार रुकारी, प्रा.रश्मी महाबळ यांच्या समितीने मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments