Friday, October 10, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामालवण बंदर निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी घडविले माणुसकीचे दर्शन...

मालवण बंदर निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी घडविले माणुसकीचे दर्शन…

अत्यवस्थ गाईवर केले उपचार ; संबंधित मालकाने गाईस नेण्याचे आवाहन…

मालवण, ता. ५ : बंदर निरीक्षक कार्यालयाच्या आवारात अत्यवस्थ स्थितीत पडलेल्या एका मोकाट गाईवर बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत उपचार केले. बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या माणूसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न नेहमी नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना भेडसावत असताना सुद्धा पालिका प्रशासन झोपी गेले आहे. मोकाट जनावरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असताना पालिका कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असाच एक प्रसंग आज मालवण बंदर कार्यालयानजीक घडला. कार्यालयाच्या आवारात एक गाय प्रकृती बिघडल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत पडली होती. यावेळी मालवण बंदर कार्यालयाचे बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, भाऊ नार्वेकर, साहेबराव कदम यांनी त्या गाईला पाणी पाजले व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी यांना बोलावून घेत उपचार केले. शिवाय ती गाय रणरणत्या उन्हात पडल्याने तिच्या सावलीसाठी तात्पुरती शेडही उभारली. बंदर निरीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचे दर्शन पहावयास मिळाले. संबंधित मालकाने त्या मोकाट जनावराची ओळख पटवून तिला घरी घेऊन जावे असे आवाहन अमोल ताम्हणकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments