दीपक केसरकर; लोकार्पण कार्यक्रमात आज झालेली गर्दी आशेचा नवा किरण…
सावंतवाडी ता.०५:तुतारी लोकार्पणाच्या निमित्ताने नवी प्रेरणा घेऊन सावंतवाडी शहर यापेक्षाही स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करूया, श्रीमंत बापूसाहेब राजे यांनी निर्माण केलेली सांस्कृतिक राजेशाही चळवळ पुन्हा एकदा याठिकाणी उभी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करूया, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान सांस्कृतिक नगरी अशी शहराची असलेली ओळख लोभ पावते की काय ? असा प्रश्न मध्यंतरीच्या काळात निर्माण झाला होता. मात्र आजच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी आशेचा नवा किरण घेऊन आली आहे, असेही भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने येथील केशवसुत कट्ट्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या तुतारीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो,माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर,शुभांगी सुकी,सुरेश भोगटे,विलास जाधव,अफरोज राजगुरू,सुनिल पेडणेकर,सत्यजित धारणकर,सतीश बागवे,डी.के.सावंत,सुधीर धुसे,सुभाष पणदूरकर,विठ्ठल कदम,रमेश बोन्द्रे, कल्पना बांदेकर,गजानन नाईक, उषा परब,तुषार वेंगुर्लेकर, साई देऊळकर,राजेश गुप्ता, संदीप नाईक, कविता जाधव,विभावरी सुकी,शैलेश नाईक,अर्षद बेग,प्रवीण कुमार ठाकरे, अमोल साटेलकर, संदीप धुरी,श्रीपाद सावंत, जनार्दन पोकळे,बाळ पुराणिक,भाई शिर्के, अरुण पणदूरकर,निलेश मेस्त्री,देवीदास आडारकर,अमित लाखे,बाळा बोर्देकर,विकास गोवेकर,सुभाष गोवेकर,शिवप्रसाद कुडपकर,अभिजीत चीतारी,देविदास बोर्डे,शामराव सावंत,महेश परूळेकर,श्वेता शिरोडकर,तानाजी वाडकर,राजन पोकळे,वी बी नाईक,रवी जाधव ,संतोष तळवणेकर,कल्याण कदम ,इफ्तिकार राजगुरू,शफीक खान,संजू शिरोडकर,भरत गावडे ,दत्तप्रसाद गोठस्कर,शंकर प्रभू,मुकुंद वझे,प्रकाश मसुरकर,माया चिटणीस,मोतीराम टोपले,सचिन मोरजकर,प्रतीक बांदेकर,भाई देवुळकर,सुधीर पराडकर,मेघना राऊळ,केशव निर्गुण,राजेश निर्गुण ,निखिल कामतेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश नाईक यांनी केले.
श्री.केसरकर पुढे म्हणाले, सावंतवाडी शहरातील राजघराण्याची ओळख असलेल्या गंजिफासाठी म्युझियम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राजवाड्याला लगतच असलेल्या शासकीय जागेत ही इमारत उभारण्यात येईल. जेणेकरून राजवाड्याचे महत्त्व सुद्धा टिकेल. आणि या ठिकाणी येणारे पर्यटक दोन्ही ठिकाणी आकर्षित होतील. तसेच राजघराण्यातील व्यक्ती त्या म्युझियममध्ये येणाऱ्या पर्यटकांना माहिती देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी श्री.साळगावकर म्हणाले, तुतारीची दुरावस्था पाहून आपण या ठिकाणी तिच्या नूतनीकरणाचा संकल्प केला. आणि अवघ्या काही दिवसातच आमच्या सरकाऱ्यांच्या मदतीने तो संकल्प पूर्ण केला. आज या ठिकाणी तुतारी लोकार्पणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने साहित्यिकांची झालेली गर्दी ही आनंददायी आहे. आजही या ठिकाणी साहित्य जिवंत आहे. त्याची ही पोचपावती आहे. असे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.