सावंतवाडीतील “तुळजा कॉस्मो”ची विशेष ऑफर; महिला दिनानिमित्त सर्व ट्रीटमेंटवर १०% सूट…
सावंतवाडी,ता.०६: चेहर्यासह शरीरावर डाग, चामखीळ तसेच अनावश्यक केस असणार्या रुग्णांना आता “टेन्शन” घेण्याची गरज नाही. त्यासाठी सावंतवाडीत सुरू असलेल्या “तुळजा कॉस्मो” क्लनीकच्या माध्यमातून अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेदनारहित “ट्रीटमेंट” देवून ते काढुन दिले जाणार आहेत. तर विशेष म्हणजे महिला दिनानिमित्त सर्व ट्रीटमेंटवर १०% सूट मिळणार आहे, अशी माहीती क्लीनीकच्या डॉ. संजना देसकर यांनी दिली.
सावंतवाडी संचयनी पॅलेस परिसरात असलेल्या तुळजा क्लीनीकच्या माध्यमातून त्वचेवरील डाग, अनावश्यक टॅटू तसेच त्वचा आणि केसावरील उपचार देणारी आधुनिक यंत्रणा रुग्णांच्या सेवेत आणण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरात या क्लीनीकच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येत आहे. मात्र यावर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष सेवा मिळणार आहे. यात केमिकल पिल सारख्या सेवेच्या माध्यमातून चेहर्यावर असलेले डाग किंवा अस्वच्छ चेहरा, नितळ करून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर पोलिस किंवा सैन्यात भरती होताना अडथळे ठरणारे टॅटू काढुन दिले जाणार आहेत. तसेच अनावश्यक असलेले केस लेझर ट्रिटमेंटच्या माध्यमातून काढुन दिले जाणार आहेत. यासाठी वेदना विरहीत प्रणाली वापरली जावून काही थेरपी एका दिवसात तर काही थेरेपी ही दोन ते तीन वेळा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून अनावश्यक चामखीळ, जन्मखूण शरीरावर असलेले डाग काढुन दिले जाणार आहे. याचा लाभ रुग्ण व त्यांच्या नातेेवाईकांनी घ्यावा, तसेच अधिक माहीतीसाठी 9404939800 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. देसकर यांनी केले आहे.