बांदा,ता.०८: येथील युवा खेळाडू ईशान कुबडे याने पुणे येथे नुकत्याच झालेल्या खुल्या क्रिकेट सामन्यात केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर थर्ड आय स्पोर्ट्स फाउंडेशन ‘बी’ संघाने वीर क्रिकेट अकॅडमी संघाचा ८४ धावांनी दणदणीत पराभव केला.
या स्पर्धेचे प्रथम फलंदाजी करताना थर्ड आय स्पोर्ट्स ‘बी’ संघाने २१४ धावांचा टप्पा गाठला. यात आदित्य पवार (१९ धावा) आणि सुषम सूर्यवंशी (१४ धावा) यांनी योगदान दिले. उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या वीर क्रिकेट अकॅडमीचा डाव केवळ १३१ धावांत संपुष्टात आला. या डावात ईशान कुबडे याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना अक्षरश: असहाय्य केले. त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने २० धावा देत ५ महत्त्वाचे फलंदाज बाद केले. वीर अकॅडमीकडून हार्दिक कामटे (२८ धावा) आणि यश कारिंदे (१० धावा) यांनी काहीसा प्रतिकार केला. या कामगिरीबद्दल ईशान कुबडे याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.