“क” वर्ग पर्यटन योजनेंतर्गत ७५ लाखांचा निधी मंजूर; निलेश राणेंचा पाठपुरावा यशस्वी…
सिंधुदुर्गनगरी, ता.०९: कुडाळ आणि मालवण तालुक्यांतील १५ पुरातन मंदिरांचा आता पर्यटन दृष्ट्या विकास होणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजना “क” वर्ग पर्यटन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वपूर्ण विकास साधला जाणार आहे. सुरुवातीला, ‘क’ वर्ग पर्यटन योजनेंतर्गत ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यात ७५ लाख रुपयांची कामे निश्चित करण्यात आली आहेत.
यात घावनळे येथील श्री. स्वामी समर्थ मठ परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, नेरूर कविलकाटे श्री. साई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, सोनवडे तर्फ कळसुळी श्रीकृष्ण मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, मोरे येथील श्री देवी माऊली मंदिर परिसर सुशोभीकरण करणे-५ लक्ष, श्री कलेश्वर मंदिर नेरूर येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविणे- ५ लक्ष, बिबवणे श्री देव गिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, श्री देवी सिद्ध सातेरी मंदिर आंजिवडे परिसर सुशोभीकरण करणे-५ लक्ष, श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर आवळेगाव परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, पांग्रड येथील श्री देव स्वयंभु महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण करणे ५ लक्ष, हळदीचे नेरूर श्री देव जटाशंकर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे ५ लक्ष एवढा निधी कुडाळ तालुक्यातील मंदिर व धार्मिक तीर्थक्षेत्र परिसर विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे.
तर मालवण तालुक्यातील बुधवळे मिर्लेश्वर भगवती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, गुरामनगरी श्री देव लिंगेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, देवली भगवती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, नांदरुख श्री देव गिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, श्री देव लिंगेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण करणे- ५ लक्ष, असगणी रामेश्वर पावणाई देवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, श्री देव जैन ब्राम्हण मांडवीर मंदिर पाणलोस येथे सुशोभिकरण करणे- ५ लक्ष या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. धार्मिक तीर्थक्षेत्र विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीप्ती पडते, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख दीपक नारकर, विनायक राणे शिवसेना मालवण तालुका प्रमुख विनायक बाईत, राजा गावडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.