Thursday, October 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीत ठाकरे सेनेचा नगराध्यक्ष पदावर दावा....

सावंतवाडीत ठाकरे सेनेचा नगराध्यक्ष पदावर दावा….

निशांत तोरसकर; आमदार केसरकरांचा लक्ष नसल्यामुळे शहरात अनेक प्रश्न…

 

सावंतवाडी,ता.०९: येणाऱ्या पालिका निवडणुकीत सावंतवाडीत २० नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष अशा २१ ही जागावर आमची लढण्याची तयारी आहे. मात्र महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही पालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. परंतु नगराध्यक्ष पदावर आमचा दावा कायम आहे, अशी भूमिका ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक निशांत तोरसकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

दरम्यान विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा लक्ष नसल्यामुळे शहरात आरोग्य, वीज, रोजगार, रस्ते आणि पाणी असे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना कोणतेही सोयर सुतक नाही. त्यामुळे या विरोधात आता शिवसेना म्हणून आम्ही आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. श्री. तोरसकर यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा उपसंघटक शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, उमेश कोरगावकर, श्रुतिका दळवी, समीरा खलील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. तोरसकर म्हणाले, या ठिकाणी शहरात आमदार दीपक केसरकर यांचा लक्ष नसल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सावंतवाडी रुग्णालयात अनेक सोयी-सुविधा मिळत नसल्यामुळे रुग्णांना गोवा-बांबुळी येथे जावे लागत आहे. तर दुसरीकडे स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांचा प्रश्न जठील बनला आहे. ग्राहकांचा विरोध असताना सुद्धा त्या ठिकाणी मीटर लावले जात आहेत. शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे आहेत. मात्र याबाबत वारंवार लक्ष वेधून सुद्धा नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. विशेष म्हणजे, नगरपालिकेचे प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यालयासमोर खड्डे आहेत, ते त्यांना बुजवता येत नाहीत, ही शोकांतिका आहे. शहरातील सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत. रोजगाराचा प्रश्न जटील आहे. स्थानिक स्तरावर रोजगार मिळणे गरजेचे असताना जर्मनीत नोकरी देतो, असे सांगून येथील तरुणांना कुटुंबापासून विभक्त करण्याचे पाप के सरकारांकडून सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराच्या विरोधात आम्ही येणाऱ्या काळात आवाज उठवणार आहोत.

याविषयी तोरसकर पुढे म्हणाले, आता होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत २१ जागा लढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आम्ही उमेदवारांची चाचणी केली आहे. तूर्तास समीरा खलील आणि श्रुतिका दळवी हे दोन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत तर अन्य काही नावे आहेत. मात्र आयत्यावेळी कोणताही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी ही नावे आम्ही गुलदस्तात ठेवली आहेत. काही झाले तरी आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडी आणि नुकताच सोबत आलेला नवा भिडू मनसे यांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक रिंगणात उतरणार आहोत. मात्र हे करत असताना आमची ताकद असलेली जागा आम्हीच लढवणार आहोत, असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments