बांदा,ता.०९: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी निमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन गटात बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ वर्षाखालील व खुल्या गटात होणार आहे.
स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवण्यात आला आहे. मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये रोख, व स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर स्मृती सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. लहान गटातील विजेत्यांना अनुक्रमे १ हजार ५००, १ हजार, ७०० रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धकांनी केदार कणबर्गी (मो. 9422394075) यांच्याकडे नावनोंदणी करावी. स्पर्धेचे परीक्षण चौथ्या आणि पाचव्या दिवशी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब यांनी केले आहे.