कुडाळ,ता.०९: दीपावलीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वतः व्यवसाय करणाऱ्या आत्मनिर्भर उद्योजकांना एका छताखाली एकत्र करुन त्यांच्या व्यवसायाला आणखी बळ देण्यासाठी आमची नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने “आम्ही आत्मनिर्भर” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये दि. १०, ११ आणि १२ ऑक्टोबर या काळात सकाळी ११ ते ९ या वेळेत हा महोत्सव सुरु राहणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार विजेती अभिनेत्री श्रद्धा खानोलकर आणि अभिनेत्री तथा इन्फ्लुएन्सर रुचिता शिर्के यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला जास्तीत-जास्त ग्राहकांनी भेट द्यावी आणि जिल्ह्यातील व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनण्यास हातभार लावावा, असे आवाहन नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळच्या अध्यक्षा संध्या तेरसे यांनी केले आहे.