Thursday, October 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मोंड सोसायटीकडून १० हजाराचा हातभार...  

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मोंड सोसायटीकडून १० हजाराचा हातभार…  

देवगड, ता.०९: मोंड सोसायटीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० हजाराची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ​संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष गोविंद झरकर, उपाध्यक्ष मधुकर नाटेकर आणि संचालक मंडळातील सदस्यांनी संस्थेच्या नफ्यातील काही भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना मांडली होती. या प्रस्तावाला उपस्थित सर्व सभासदांनी एकमुखाने अनुमोदन दिले.

​त्यानुसार आज संस्थेचे अध्यक्ष श्री. झरकर, सचिव प्रभाकर बिर्जे आणि संचालक मंडळातील सदस्य यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश बोडस यांच्या उपस्थितीत सदर रकमेचा धनादेश देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे सुपूर्द केला. ​यावेळी तहसीलदार श्री. पवार यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सहकार क्षेत्रातून समाजाभिमुख कार्याची दिशा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. मोंड सोसायटीच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments