कुडाळ,ता.०९: झाराप येथील श्री देवी भावई मित्रमंडळाच्या वतीने, तेथीलच श्री देवी भावई मंदिरात दोन दिवसीय जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ आणि १२ ऑक्टोबरला ही स्पर्धा होणार आहेत.
यात ११ ऑक्टोबरला सायं. ७. वा. श्री ब्राह्मण देव महिला मंडळ, पावशी -मिटक्याचीवाडी, ७.४५ वा. गुरुकुल संगीत मंडळ, कुडाळ, रात्री ८.३० वा. दत्तगुरु मंडळ, वैभववाडी, ९.१५ वा. नवतरुण युवक मंडळ, माणगाव, १० वा. श्री देव समाधी पुरुष मंडळ, मळगाव, १२ ऑक्टोबरला सायं. ७ वा. गोठण मंडळ, वजराट-देवसूवाडी, ७.४५ वा. स्वरधारा मंडळ, तांबोळी, रात्री ८.३० वा. रामकृष्ण हरी भजन सेवा संघ, पाट पंचक्रोशी, ९.१५ वा. सद्गुरु मंडळ, अणसूर पाल, रात्री १० वा. चिंतामणी मंडळ, सुरंगपाणी-वेंगुर्ले आदी भजने होणार आहेत. तरी भजन रसिकांनी वेळेवर उपस्थित राहून भजनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री देवी भावई मित्रमंडळाने केले आहे.