Friday, October 10, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याविलवडे येथे चोरट्याने मध्यरात्री तीन दुकाने फोडली...

विलवडे येथे चोरट्याने मध्यरात्री तीन दुकाने फोडली…

बांदा, ता.१०: विलवडे येथे मध्यरात्रीच्या सुमारास तीन दुकाने चोरट्यांनी फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. या वारंवार घडणाऱ्या चोरीच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ​ही तिन्ही दुकाने भर वस्तीत असूनही चोरट्याने शिताफीने चोरी केली. चोरी झालेल्यांमध्ये दोन भुसारी, एक टेलरिंग दुकान आणि एक सलूनचा समावेश आहे. घटनेची माहिती सरपंच प्रकाश दळवी यांनी बांदा पोलीस स्थानकात कळविताच पोलीस कॉन्स्टेबल आर. बी. तेली हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा झाल्यानंतर नेमका प्रकार उघडकीस येणार आहे.

परशुराम दळवी यांचे किराणा दुकान फोडून आतील ५५० रुपये रोकड, दीपक नाईक यांचे टेलरिंग दुकान फोडून आतील २०० रुपये रोकड, अविनाश कदम यांचे सलून फोडून २०० रुपयांची रोकड, तर आणखी एक भुसारी दुकान फोडून आतील १ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लांबविली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments