सावंतवाडी,ता.१०: क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ओरोस यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत ४६ किलो वजन गटांमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला .तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच कुमारी कृतिका विष्णू राणे ४२ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थिनीचे व त्यांना मार्गदर्शन करणारे किरण देसाई यांचे मळगांव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगांवकर, सचिव आर. आर. राऊळ, शाळा सचिव चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, माजी विद्यार्थी परिवार तर्फे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.