निलेश राणेंकडुन पाठराखण; “ती” टिका प्रवेशापुर्वीची, आता चर्चा नको…
सावंतवाडी,ता.१०: जिल्हा बँके बाबत मला आपुलकी आहे. त्यामुळे झालेला विषयावर आता चर्चा नको, परंतू माझ्या कोणी किती त्या तक्रारी करा, राजन तेली घाबरणारा नाही, असे प्रत्युत्तर खुद्द राजन तेलींनी आज येथे पत्रकार परिषदे दरम्यान विरोधकांना दिले. मला कोणतीही नोटीस आली नव्हती. मात्र पत्रकारांनीच हा विषय ट्वीस्ट केला. एखादी चौकशी होण्यासाठी नोटीस यावी लागते, असे सांगून त्यांनी पत्रकारांनाच जबाबदार धरले. हाच धागा पकडून ती टिका प्रवेशापुर्वीची होती. आता हा विषय संपला, असे सांगून आमदार निलेश राणेंनी या चर्चेवर फुलस्टॉप दिला.
चौकशीला घाबरुन शिवसेनेत प्रवेश केला, असा आरोप ठाकरे सेनेच्या माध्यमातून करण्यात आला होता. याबाबत उपस्थित पत्रकारांनी तेली व राणेंना छेडले असता तेलींनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला आज ही जिल्हा बॅकेबाबत सहानभुती आहे. त्यामुळे त्या विरोधात काही बोलणार नाही. मी वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यावर आता काही बोलणार नाही आणि कोणी त्या आणखी तक्रारी कराव्यात राजन तेली कोणाला घाबरणार नाही, असे त्यांनी सांगितले. तर यावेळी श्री. राणे यांनी हाच धागा पकडून टिका-टिप्पणी झालेला विषय हा प्रवेशापुर्वीच होता. त्यामुळे आता या विषयावर चर्चा नको, असे सांगुन यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तसेच एखादी चौकशी होण्यासाठी नोटीस यावी लागते तशा प्रकारची कोणतीही नोटीस त्यांना आलेली नाही, असे सांगितले. यावर पत्रकारांनीच मला कोणतीही नोटीस आलेली नसताना अगदी मोठ्या स्थानावर नेले, असे तेली म्हणाले.