कुडाळ,ता.१०: येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅ. नाथ पै बी. एड. कॉलेज या केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमापैकी योग शिक्षक पदविका शिक्षणक्रम, एम. ए. योगा, एम ए शिक्षण शास्त्र, शालेय व्यवस्थापन पदविका, बहिस्थ बी. एस्सी. हे शिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांमधील योगशिक्षक पदविका शिक्षणक्रमाच्या २०२३-२४ च्या बॅचचा पदविका प्रदान समारंभ १४ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता होणार आहे.
हा पदविका प्रदान समारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली, व कुडाळचे तहसिलदार वीरसिंग वसावे, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १४ ला दुपारी ३ वाजता बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळच्या सभागृहामध्ये होणार आहे. तरी ‘२०२३-२४ च्या योग शिक्षक पदविका’ शिक्षणक्रमाच्या बॅच मधील प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली पदविका प्रमाणपत्र स्वीकारावित, असे आवाहन केंद्राचे केंद्रप्रमुख परेश धावडे व केंद्र समन्वयक प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी केले आहे.