सावंतवाडी ता.११: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी जागा आरक्षित करण्यासाठी तसेच सर्वसाधारण जागा निश्चित करण्यासाठी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे.या सभा १३ ऑक्टोबर ला सकाळी
वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यातील तहसील कार्यालयात होणार आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ आणि २०२५ च्या नियमांनुसार हे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या सभेस सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरुची घोडमिसे यांनी केले आहे.