Homeकोकणातील ताज्या बातम्याशरद पवार राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा सायली दुभाषी शिवसेनेत दाखल...

शरद पवार राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा सायली दुभाषी शिवसेनेत दाखल…

संजू परबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश; राबिया शेख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश…

सावंतवाडी,ता.१३: पालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाच्या शहराध्यक्षा सौ. सायली दुभाषी आणि अल्पसंख्यांक शहराध्यक्ष राबिया शेख यांनी आपल्या समर्थकासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना  जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण हा प्रवेश केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आगामी काळात शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारीची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आज झिरंग येथे आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश घेण्यात आला.

​. यावेळी त्यांच्या समवेत झहूर खान, इलियास आगा, तौसिफ आगा, सोहेल शेख, फिरोज खान, आरिफ खान, शौकत बेग, अनिस शेख, अझहर रेशमी, रियाज अत्तार, रमजान नाईकवाडी, वाजीद खान, शहाबाद आगा, मंगेश घाडीगावकर, पापा ऐन्नी, रुकसाना खान, काशिनाथ दुभाषी, साजिदा फिरोज खान, श्रावणी श्रीकांत कोरगावकर, श्रीकांत कोरगावकर, गणेश निंबाळकर, सिद्धी नागेश निंबाळकर, तैमीन तहसीलदार, फिरदोस जहूर खान, नंदिनी वेंगुर्लेकर, अलका अर्जुन नाईक, महेक महंमद खान, शहनाज आरिफ खान, अमृता अनिल नाईक, सकीना वाजिद खान, फातिमा अहमद खान, जिलेखा आयुब खान, नुसरत असिफ खान, रिदा अझहर रेशमी, हसीना पापा ऐन्नी, फरदीन शेख, वाहिदा शौकत बेग, झेबा नाईक, अनुष्का मातोंडकर, शेवंती घाडीगावकर, फैजा खान आदींनी प्रवेश केला.​यावेळी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर,सचिव परीक्षित मांजरेकर, युवा सेनेचे शहराध्यक्ष अर्चित पोकळे, कोलगाव शाखाप्रमुख गौरव कुडाळकर, समीर पालव आणि शिवसेना व युवा सेनेचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments