वेंगुर्ला,ता.०५: इंडियन वुमन सायंटिस्टस असोसिएशनतर्फे महिला दिनानिमित्त ९ मार्चला ऑनलाईन जागतिक विज्ञान परिषद होणार आहे. प्रशासन अधिकारी डॉ.मंजिरी मोरे-देसाई आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.धनश्री पाटील या विज्ञान परिषदेचे समन्वयक म्हणून काम पहाणार आहेत.
या परिषदेत ‘महिला व पर्यावरणाच्या सामाजिक फायद्यासाठी अंतराठ तंत्रज्ञानाचा उपयोग‘यावर डॉ.दिप्ती देवबागकर, ‘महिला आणि पर्यावरणाच्या शाश्वत विकासाचे सामाजिक व आर्थिक पैलू‘ यावर कुलगुरु डॉ.मृणालिनी फडणवीस, ‘ग्रामीण महिलांसाठी नैसर्गिक संसाधाने आणि गुंतवणूक‘ यावर रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गर्व्हनर उषा थोरात, ‘कृषी व औद्योगिक कचरा मुल्यमापनःचक्रीय अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल‘ यावर डॉ.अर्चना ठाकूर तर ‘जागतिक बाजारपेठेतील बहुचर्चित पिकावर आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातू नवीन संधीची ओळख‘ यावर डॉ.मनिषा राजेभोसले आदी महिला संशोधक पर्यावरण संवर्धनाची मांडणी करणार आहेत.
महिला व पर्यावरण व्यवस्थापन भूमिका, संबंधित पर्यावरणासह सामाजिक फायद्यासाठी अवकाश तंत्रज्ञान, तटीय जैवविविधता संवर्धन, पाणी जीर्णोद्धार, निसर्गाचे पालनपोषण करण्यासाठी महिलांची सामाजिक पर्यावरणीय भूमिका, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या संदर्भात अर्थशास्त्र, नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून उपजिविका पद्धती, सेंद्रिय शेती करणा-या महिला, महिला शाश्वत निसर्ग उभारणीत भूमिका आदी विषयावरील संशोधन प्रबंध jswakolhapurbranch@gmail.com या मेलवर पाठावावेत असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ.धनश्री पाटील (९१४६४३४५६०) यांच्याशी संपर्क साधावा.
वेंगुर्ले येथे ९ मार्चला ऑनलाईन जागतिक विज्ञान परिषद….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES