बांदा,ता.०५: गोवा सालीगाव येथुन भारतातील पहीले साईमंदीर असलेल्या कवील काटे कुडाळ येथे निघालेल्या साईच्या पालखीचे बांदा शहरातील ऐतीहासीक साईमठातर्फे भक्तीपुर्ण वातावरणात स्वागतकरण्यात आले.
यावेळी साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर,उपाध्येक्ष रविंद्र मालवणकर, खजीनदार राजेश कारेकर, ज्ञानेश्वर केसरकर, साईराज सांळगावकर, प्रितेश केसरकर,शैलेश केसरकर, संकल्प केसरकर,मंगलदास सांळगावकर, सौ दर्शना केसरकर, सौ प्रिया केसरकर, श्रेया केसरकर, जेष्ठ भजन कर्मी गिरीष महाजन उपस्थित होते. गिरीष महाजन यानी स्वागत केले. यावेळी साईची आरती करण्यात आली. व गोव्यातुन आलेल्या सर्व साईभक्ताचे स्वागत करण्यात आले.या पालखी पदयात्रे सोहळ्यात गोव्यातील महीला भगीनीही सहभागी झाल्या होत्या.