कणकवली,ता.५: तालुक्यातील घोणसरी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गांगेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनेलने विजय संपादन केला. एकूण बारा जागांपैकी १० जागांवर या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले तर प्रतिस्पर्धी भाजपा पुरस्कृत श्री सिद्धिविनायक सहकार पॅनेलचा धुव्वा उडाला.
घोणसरी सोसायटीच्या विजयी संचालकांचे शिवसेना नेते आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संदेश पटेल, फोंडाघाट सोसायटी चेअरमन सुभाष सावंत, राजन नानचे यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत एकूण २५ मते बाद ठरली.
भाजपच्या वतीने पंचायत समिती सभापती मनोज रावराणे प्रचाराची धुरा सांभाळली होती. तर शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांनी गांगेश्वर ग्रामविकास आघाडीला विजय मिळवून दिला. शिवसेनेचे दीपक पुंडलिक राणे, उदय अनंत राणे, विश्वजित अनंत राणे, प्रकाश प्रभाकर हिर्लेकर, रामदास महादेव इंदुलकर, भास्कर सीताराम साळवी, ऐश्वर्या अनंत सावंत, श्रद्धा अनंत राणे, कृष्णा महादेव एकावडे, रामा सोमा जाधव हे उमेदवार संचालकपदी निवडून आले आहेत. तर भाजपचे मकरंद प्रकाश पारकर, मॅक्सि पेद्रु पिंटो हे दोन उमेदवार संचालकपदी निवडून आले आहेत.
शिवसेना पुरस्कृत पॅनल च्या विजयासाठी दीपक सावंत, दीपक राणे, दर्शन मराठे, बाबाजी राणे, प्रसाद राणे, विजय मराठे , संतोष शिंदे, रवी शिंदे, आबु येंडे, गोटू राणे, संतोष सावंत, अनिल सावंत, आबा आयरे, मनोहर गुरव, प्रमोद राणे, संतान मामा, नितीन एकावडे, सचिन सुतार, संदीप सुतार, छोटू खाडये आदींनी मेहनत घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण कांबळी यांनी काम पाहिले.