तात्काळ अहवाल करा; अन्यथा १५ तारखेनंतर आंदोलन, ग्रामस्थांचा इशारा…
आंबोली, ता.०५: येथील कबुलायातदार गावकर प्रश्नावरून आज पुन्हा आमदार दीपक केसरकर यांनी आंबोलीत जावून गेळेसह आंबोलीतील ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी जमीनी संदर्भात १४ तारखेपर्यंत वन आणि महसूल विभागाचा अहवाल तयार न झाल्यास १५ तारखेला प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. सकाळी झालेल्या बैठकीनंतर ८ तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र याबाबतची माहीती मिळताच श्री.केसरकर यांनी ग्रामस्थांची भेट घेवून चर्चा केली.
यावेळी प्रांताधिकारी पानवेकर,नायब तहसीलदार श्री.मुसळे,वनक्षेत्रपाल विद्या कोडगी, सरपंच गजानन पालेकर,उपसरपंच दत्तू नार्वेकर,सर्कल गुरुनाथ गुरव,तलाठी सुमित घाडीगावकर,शशिकांत गावडे,जगन्नाथ गावडे,मनोहर गावडे,श्रीकांत गावडे,बबन गावडे,राजेश गावडे,प्रकाश गावडे, बाळा गावडे,दुबा राऊत,दाजी गुरव,रत्नाकर फोंडेकर,भारतभूषण,उल्हास गावडे,सुनील नार्वेकर,उत्तम पारधी,विलास गावडे,रामा गावडे,लक्ष्मण गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेवर केसरकर यांनी मुख्य मंत्री यांच्याकडे मीटिंगसाठी वेळ मागितला आहे. हा प्रश्न धोरणात्मक असून मंत्रालय पातळीवर आहे. लवकरच बैठक घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी ८ तारखेचे धरणे आंदोलन स्थगित करून अहवाल तयार न झाल्यास १५ तारीखला आंदोलन करणार असल्याचे सरपंच गजानन पालेकर यांनी सांगितले.