Saturday, October 11, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्ले येथील कॅथॉलिक पतसंस्थेच्या शाखेचा उद्या "स्थलांतरण" सोहळा...

वेंगुर्ले येथील कॅथॉलिक पतसंस्थेच्या शाखेचा उद्या “स्थलांतरण” सोहळा…

पी.एफ.डॉन्टस; सभासद, ग्राहक व हितचिंतकांना उपस्थित राहण्याचे आवाहन…

वेंगुर्ले,ता.०६: येथील कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसा. लि. शाखेचा “स्थलांतरण” सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. दाभोली नाका येथील पाटील चेंबर्समध्ये स्वमालकीच्या जागेत ही शाखा स्थलांतरित करण्यात आली असून त्याचे उद्घाटन स.१०:०० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी केले आहे.

गेली अनेक वर्षे कॅथलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी ही संस्था ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना कर्जपुरवठ्यासह विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. कॅथॉलिक समाजासह सर्व धर्मीयांना ही संस्था सहकार्य करीत आहे. दरम्यान वेंगुर्ले येथे कार्यरत असलेली या पतसंस्थेची शाखा आता दाभोली नाका येथील पाटील चेंबर्स इमारतीत स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित करण्यात आली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे, तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.डॉन्टस यांच्यासह उपाध्यक्ष फ्रान्सिस डिसोजा, सेक्रेटरी मार्टिन अल्मेडा, सर्व संचालक मंडळ व सेवक वर्गाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments