Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवलीत आप्पा काणेकर ट्रस्टचे विविध पुरस्कार जाहीर...

कणकवलीत आप्पा काणेकर ट्रस्टचे विविध पुरस्कार जाहीर…

कणकवली, ता. १२ : कणकवलीतील कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्ट यांच्याकडून विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची माहिती ट्रस्टचे संस्थापक महेश काणेकर यांनी केली. यात जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट यांना जाहीर करण्यात आला आहे.

इतर पुरस्कारांमध्ये उमा काणेकर स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार विधी मुद्राळे, उपक्रमशील पुरस्कार स्वाती पाटील, बालसाहित्य सेवा पुरस्कार विठ्ठल कदम, कला गौरव पुरस्कार प्रसाद राणे, समाजभूषण पुरस्कार संजय आंग्रे, साहित्य वैभव पुरस्कार गौरव खतकल्ले यांना जाहीर करण्यात आले आहेत.

हा पुरस्कार वितरण समारंभ २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता कणकवली नगरवाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. यावेळी साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड, कोकणचे साहित्यिक डाॅ. राम मेस्त्री, ज्‍येष्‍ठ पत्रकार प्रकाश केसरकर यांच्याहस्ते पुरस्कार विजेत्‍यांचा गौरव होणार आहे.

गेली १६ वर्षे काणेकर ट्रस्टच्या माध्यमातून विविध पुरस्कार देऊन त्या व्यक्तींना प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्‍यान यंदा सद्भावना सत्कार म्हणून सुधीर राणे (कणकवली), उदय दुधवडकर (बुरंबावडे, ता. देवगड), लोकसंगीत सेवेबद्दल बुवा संदीप परब (चिंदर, ता. मालवण) यांनाही यावेळी विशेष गौरविण्यात येणार आहे. याखेरीज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्‍कार होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments