बारावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९८.९१ टक्के…

5
2
Google search engine
Google search engine

आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तालुक्यात प्रथम…

कणकवली,ता.०८: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९८.९१ टक्के एवढा लागला आहे. यात वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूलचे चार विद्यार्थी तालुक्यात प्रथम आले आहेत. यात प्रथम क्रमांकावरील स्नेहल परब आणि मृण्मयी गायकवाड यांना प्रत्येकी ९३.१७ टक्के गुण मिळाले आहेत. द्वितीय क्रमांकावरील अमृता चोपडे हिला ९२.५० टक्के तर तृतीय क्रमांक असलेल्या प्राची तायशेटे ९२.३३ टक्के गुण मिळाले आहेत.

तालुक्यातील हायस्कूल निहाय निकाल पुढील प्रमाणे आहे.

कणकवली कॉलेजचा बारावीचा निकाल ९८.०६ टक्के लागला आहे.

यात वाणिज्य शाखेचा निकाल ९७.७१% लागला असून या शाखेतून सायली सुरेंद्र गगनग्रास आणि पूजा चंद्रकांत गोसावी यांनी ९०.१७% गुण मिळवत विभागून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर साक्षी संजीव गोगटे ८७.५०% आणि पूर्वजा बाबुराव सांडव ८७.३३% यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.८०% लागला असून श्रेयश शंकर बागवे याने ८९.१७% मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर ओम उदय आवळे याने ८९.००% आणि निधी किरण बावकर हिने ८६.५०% गुण प्राप्त करत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कला शाखेचा निकाल ९८.६८% लागला असून वैष्णवी भरत सरवदे ही ८७.००% गुण प्राप्त करत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. सायली वामन बांद्रे ८१.३३% गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर पूर्वा गंगाराम वेंगुर्लेकर आणि शिवानी गोपाळ वर्दम यांनी ८१.०० गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. एम. सी. व्ही. सी. विभागाचा निकाल ९३.३३% लागला असून रुपाली रविंद्र पवार ७८.००% गुण मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर वैष्णवी गजानन बेळेकर ७३.५०% आणि अनिषा अनिल घाडीगावकर हिने ७२.८३% मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

 

आयडियल इंग्लीश स्कुल अ‍ॅन्ड ज्युनि. कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्सचा बारावीचा निकाल १०० टक्के असून विज्ञान शाखेत विशेष श्रेणीत ७८ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १२ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ६ विद्यार्थी, एकूण ९६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. वाणिज्य शाखेत विशेष प्राविण्य श्रेणीत ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थी, तृतीय श्रेणी १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण ६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

विज्ञान शाखेतून स्नेहल राजेंद्र परब व मृण्मयी वि गायकवाड या ९३.१७% गुण मिळवून प्रथम आल्या आहेत. ९२.५०% सह अमृता चोपडे हिने दुसरा क्रमांक तर प्राची अनिल तायशेटे हिने ९२.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेतून प्रार्थना पटेल हीने ८३.८३% गुणांसह पहिला क्रमांक प्राप्त केला. सलोनी शिरवलकर ८३% सह द्वितीय तर साहिल कदम याने ७८% सह तृतीय क्रमांक मिळवला आहे.

 

एस. एम. ज्युनिअर कॉलेज कणकवलीचा निकाल शंभर टक्के

कणकवली येथील एस. एम. ज्युनिअर कॉलेजचा एच. एस. सी. चा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान शाखेमधून आशिष सतीश भोसले याने ९३.१७% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. लव धोंडू परब याने ८३% गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर हर्षदा भालचंद्र हरकूळकर हिने ७८.८३% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. वाणिज्य शाखेमधून पूर्वा मंगेश चव्हाण हिने ८४.५% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर नितेश श्रीधर येंडे याने ८४.१७% आणि सुरभी देवदास चव्हाण हिने ७९.८३% गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. एम. सी. व्ही. सी. शाखेमधून दिव्या संजय चव्हाण हिने ७२% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर वेदांत राजेश सोहनी याने ६९.८३% मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर अनंत महेश शिरोडकर आणि दीक्षा सतीश तेंडुलकर यांनी ६८.८३% गुण मिळवत विभागून तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे व्यवस्थापक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच पालकांकडून अभिनंदन केले जात आहे.