सिंधुदुर्गात दोन जुलैपासून पुन्हा “लॉक-डाऊन”…

2

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती;वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता निर्णय…

सिंधुदुर्गनगरी,ता.३०: जिल्ह्यात कोरोनाची वाढती लोकसंख्या व जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना काळजीबाबत केलेला दुर्लक्ष यामुळे सामाजिक प्रसाराचा धोका ओळखत जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी 2 जुलै पासून जिल्ह्यात लॉकडाउन जाहिर केला आहे. 8 जुलै पर्यंत हे लॉकडाउन राहणार आहे. या कालावधीत जीवनावश्यक सेवा, कृषि वगळता सर्व व्यवस्थापन बंद राहणार आहेत. अनावश्यक बाहेर फिरताना दिसल्यास पूर्वी प्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयात आपातकालीन यंत्रणा वगळता 10 टक्के उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती यावेळी मंजुलक्ष्मी यांनी दिली.

4