सिंधुदुर्गात आज आणखीन पाच पॉझिटिव्ह रुग्ण…

31532
2
Google search engine
Google search engine

दिवसभराचा आकडा सात, एकूण रुग्णांची संख्या आता २४…

ओरोस ता २८: सिंधुदुर्गाला गुरुवारी दूसरा धक्का बसला आहे. सकाळी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. आता पुन्हा पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभरात सात रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २४ झाली आहे.यात कुडाळ तालुक्यातील २, सावंतवाडी तालुक्यातील २,आणि वैभववाडी तालुक्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे.