सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला….

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०५: जिल्ह्यात तीसरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती वेंगुर्ले तालुक्यातील असून आंबा वाहतूक करण्यासाठी मुंबई या हॉटस्पॉट ठिकाणी गेली होती. २७ एप्रिल रोजी परत आल्यानंतर त्याला संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते. २ मे रोजी त्याचा स्त्राव घेवून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज त्याचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे.

आज नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. सदर रुग्ण हा दिनांक २६ एप्रिल २०२० रोजी मुंबई येथे गेला होता.तर दिनांक २७ एप्रिल २०२० रोजी तो परत आला.त्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. मुंबई येथील हॉटस्पॉटमधून आल्यामुळे त्याचा दिनांक २ मे २०२० रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.आता त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.वेंगुर्ला तालुक्यातील या रुग्णाचे गाव कॉन्टेन्मेंट झोन केले असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

4