सावंतवाडीतील राजमाता सत्वशीलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालयचा बारावीचा निकाल ९७.९३ टक्के…

5
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०८: येथील राजमाता सत्वशीलादेवी भोंसले कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.९३ टक्के इतका लागला आहे. यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के यश मिळविले. तर वाणिज्य शाखेच्या निकाल ९८.७३% व कला शाखेचा निकाल ९०.३८% इतका लागला आहे. दरम्यान यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेम सावंत-भोसले आणि संस्थेच्या चेअरमन श्रीमंत शुभदादेवी भोसले यांनी अभिनंदन केले.

विज्ञान शाखेत प्रथम अपर्णा भिमसेन नाईक 89.33, द्वितीय रुद्रेश रविंद्र सावंत 87.50, मिताली रत्नाकर नाईक 80.50% गुण मिळवत प्रथम तीन क्रमांकात येण्याचा मान पटकाविला.

वाणिज्य शाखेत प्रथम साई रवींद्र निब्रे 89.83, द्वितीय वेदांत दत्तप्रसाद मसुरकर 85.00, तृतीय सोहम अनिल साळगावकर 84.00 आदींनी क्रमांक मिळविले.

कला शाखेत प्रथम साक्षी नागेश सबनिस 90.83%, द्वितीय सानिया समीर भाट 88% तृतीय दरोती जॉर्जी गोम्स 85.50 आदींनी यश संपादन केले.