कुडाळ-साळगाव महाविद्यालयात “हॉटेल मॅनेजमेंट” शिकण्याची मोठी संधी…  

13
2
Google search engine
Google search engine

जयहिंद संस्थेचा पुढाकार; बी.एस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज अभ्यासक्रम सुरू…

कुडाळ,ता.१४: सिंधुदुर्गात दिवसेंदिवस वाढणारा पर्यटकांचा वोघ आणि जिल्ह्यातील विविध हॉटेल्समध्ये भासणारी प्रशिक्षित आचाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन जयहिंद संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी साळगाव येथे “हॉटेल मॅनेजमेंट” (बी. एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज) हा पदवी अभ्यासक्रम सुरु केला. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने मुंबई विद्यापीठा अंतर्गत हे शिक्षण दिले जात असून अत्यंत माफक शुल्क आणि सर्व प्रकारच्या सुविधा संस्थेमार्फत पुरविण्यात आल्या आहेत. त्याचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.ठाकूर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून दिवसेंदिवस या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक जिल्ह्यात येतात. त्यांना रुचकर व चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळण्यासाठी विविध ठिकाणी हॉटेल्सही उभारली गेली आहेत. मात्र ते बनविण्यासाठी प्रशिक्षित विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे हॉटेल व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाल्यास ते पर्यटकांना चांगल्या प्रकारे सेवा पुरवु शकतात. याचा विचार करून लॉकडाऊनच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांनी केक, अन्नपदार्थांची होम डिलिव्हरी केली . अनेकांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्य क्षमतेतून घरबसल्या उत्पन्न मिळविले. हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातून अशा प्रकारची सेवा, स्वतःची नोकरी किंवा व्यवसाय नजिकच्या काळात सुरु ठेवणे शक्य होणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले .

गेल्या काही वर्षात हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. हे सेवाक्षेत्र असल्याने या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात नोकऱ्या तसेच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची क्षमता आहे . त्यामुळे हा अभ्यासक्रम शंभर टक्के नोकरी देण्यास सक्षम आहे. या उद्योगावर मंदीचा किंवा कुठल्याही व्यावसायिक संकटांचा परिणाम होत नाही.

अलिकडे सर्वात जास्त विस्तारणारी इंडस्ट्री म्हणून हॉटेलकडे पाहिले जाते. त्यामुळे नोकरी आणि स्वत:चा व्यवसाय करणा-यांसाठी हा अभ्यासक्रम ही एक संधी आहे. हॉटेलिंगमध्ये मार्क्सची अट नसते. शिक्षण झाल्यानंतर नोकरी शोधण्याचीही गरज नसते. हे युनिक करिअर आहे. परंतू आपल्याकडे अजून या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित होण्याची गरज आहे. अलीकडे तंत्रज्ञानाच्या स्फोटाबरोबर मानवी राहणीमानाचा दर्जाही सुधारला गेला आहे. गेल्या काही वर्षात देशाला पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पनात वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायालाही सुगीचे दिवस आले आहेत व भविष्यात राहणार आहेत . रोजगाराच्या अमाप संधी इथे उपलब्ध असल्याने जागतिक मंदीचाही परिणाम या क्षेत्रावर होणार नाही. भविष्यात या क्षेत्रात करिअरच्या अफलातून संधी असल्याने गेल्या काही वर्षांत हॉटेल व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. हॉटेल मॅनेजमेंटमधलं करिअर कॉलेजिअन्समध्ये फेव्हरेट मानलं जातं.

महाविद्यालयाचे प्रशिक्षण

भारतात व परदेशात या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या पदवीमुळे आपण आपला हॉटेल व्यवसायसुध्दा सुरु करू शकतो. तसेच विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये चांगल्या पदाची नोकरी मिळू शकते. अशी सेवा जयहिंद संस्था संचलित जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स , साळगाव गेली आठ वर्षे विद्यार्थ्यांना देत आहे . क्लब महेंद्रा , रॉयल ऑर्चिड लोणावळा व पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांचे प्रॅक्टिकल व इंडस्ट्रियल ट्रेंनिंग देऊन त्यांना त्या कंपन्या आपल्याकडे नोकरीची संधी प्राप्त करून देतात.

४५ टक्के गुण प्राप्त झालेला बारावीचा कोणत्याही शाखेचा विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो . उत्कृष्ट निसर्गरम्य परिसर , सुसज्ज ग्रंथालय , संगणक कक्ष, अद्ययावत किचन , रेस्टॉरंट, फ्रंट ऑफिस , हॉस्पिटॅलिटी कक्ष, तसेच वसतिगृहाची सोय आणि प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग या ठिकाणी आहे .तरी अधिक माहिती व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्राचार्य, जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स, साळगाव, ता. कुडाळ,7030938095, 9890945878, 9421930543 येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.