सावंतवाडी मनसेच्या वतीने विविध उपक्रमांनी राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा…

14
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१४: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त येथील कार्यालयात वृक्ष व शालेय विद्यार्थ्यांना वही-पेन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना ५४ वृक्षांचे वाटप करण्यात आले. तर उद्यापासून शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन वह्या-पेन वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी बोलताना शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली.

श्री. ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस मनसेकडून सर्वत्र विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. या वाढदिवसानिमित्त येथील शहर मध्यवर्ती कार्यालय देखील विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. श्री. ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५४ वृक्ष वाटप करण्याचा संकल्प ठेऊन शहर मध्यवर्ती कार्यालयात वृक्ष वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे आता शाळा चालू झाल्याने शाळेचा विचार करून शालेय मुलांना वह्या आणि पेन वाटप उपक्रम राबविण्यात आला. ह्या उपक्रमाची सुरुवात शहर मध्यवर्ती कार्यालयात विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करून करण्यात आली.

यावेळी बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे संतोष भैरवकर उपशहर अध्यक्ष शुभम सावंत डिंगणे ग्रा प सदस्य आदेश सावंत बांदा विभागीय अध्यक्ष नाना सावंत लॉटरी सेना तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे धाकोरे शाखा अध्यक्ष निलेश मुळीक बाबू राउळ, मनोज कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते