मागच्या सारखी परिस्थिती नको म्हणून एकनाथ शिंदेंना मंत्रिपद…

3
2
Google search engine
Google search engine

रूपेश राऊळ; मुख्यमंत्रीच्या “लॉलीपॉप” ला सच्चा शिवसैनिक बळी पडणार नाही…

सावंतवाडी,ता.३०: मागच्या वेळी सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री पद बंडखोर एकनाथ शिंदे यांना देऊन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस नामानिराळे राहिले, मात्र ह्या लॉलीपॉपला सच्चा शिवसैनिक कदापी बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया सावंतवाडी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली. दरम्यान हाच निर्णय घ्यायचा होता, तर अडीच वर्षांपूर्वी तसा प्रस्ताव शिवसेनेने भाजप समोर ठेवला होता. त्यावेळीच तो प्रस्ताव मान्य झाला असता तर शिवसैनिक आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज सोबत असले असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी श्री. शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर श्री. राऊळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, हा प्रकार म्हणजे दिखाऊ पणा आहे. मात्र शिवसेना आणि सच्चा शिवसैनिक त्याला बळी पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.