लाच स्विकारल्याप्रकरणी सिंधुदुर्गातील महिला पोलिस अधिकाऱ्याला अटक…

8
2
Google search engine
Google search engine

दोन लाख घेताना ताब्यात; सोनोग्राफी सेंटर सिल न करण्यासाठी मागितली रक्कम…

सावंतवाडी,ता.०१: गर्भलिंग निदान केल्याच्या आरोपानंतर निगडी-पुणे येथील हॉस्पिटलचे सोनोग्राफी सेंटर सिल न करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी पाच लाखाची लाच मागितल्या प्रकरणी पुणे लाच लुचपत विभागाच्या पथकाने सिंधुदुर्ग पोलिसांत महिला निवारण कक्षात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस निरिक्षक नलिनी शंकर शिंदे हीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल पुणे येथे करण्यात आली. दोन लाख रुपयांची रोकड घेताना तीला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
याबाबत अधिक माहीती अशी की, यातील गुन्हा हा पुणे-निगडी येथील एका हॉस्पिटल मध्ये घडला होता. या प्रकरणी याची नोंद मालवण पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्या ठिकाणी महिला पोलिस अधिकारी नसल्यामुळे या गुन्ह्याचा तपास शिंदे हीच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान याकामी तपास करताना शिंदे हीने तक्रारदार तथा संबधित हॉस्पिटच्या ६२ वर्षीय महिला डॉक्टरांना आपण तपासकामात सहकार्य करतो तसेच हॉस्पिटल मधील सोनोग्राफी सेंटर सिल करीत नाही, असे सांगुन तब्बल पाच लाखाची मागणी केली. तसेच ही रक्कम मिळविण्यासाठी वारंवार पाठपुरावा तसेच त्रास दिला. दरम्यान या प्रकाराला कंटाळलेल्या संबधित महिलेने पुणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार छापा टाकुन शिंदे हीला पुणे येथे अटक करण्यात आली आहे.